रावेर तालुक्यातील भारतीय संरक्षण सेवेत कार्य करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांना मोफत रुग्णसेवा देण्याचा निर्धार - डॉ. दिपक पाटील
रावेर तालुक्यातील भारतीय संरक्षण सेवेत कार्य करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांना मोफत रुग्णसेवा देण्याचा निर्धार - डॉ. दिपक पाटील
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी दिपक तायडे,रावेर : रावेर तालुक्यातील वाघोड गावचे सुपुत्र श्री. योगेश राजाराम महाजन हे इंडियन आर्मी च्या २२ वर्षाच्या प्रदीर्घ देशसेवेतून ३१ जुलै २०२२ रोजी, सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांच्या सेवानिवृत्ती गौरव सोहळा कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहून त्यांचा सत्कार करतांना श्री. वाय. व्ही. पाटील, डॉ. दिपक पाटील उपस्थित राहून त्यांच्या देशसेवेस सलाम केला.
तसेच सदर कार्यक्रमाप्रसंगी डॉ. दिपक पाटील यांनी रावेर तालुक्यातील भारतीय संरक्षण सेवेत कार्य करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांना मोफत रुग्णसेवा देण्याचा निर्धार यावेळी केला. त्यांच्या निर्धाराला उपस्थितांतनी साद देत टाळ्यांचा कळकळात केला.
कार्यक्रमाप्रसंगी सेवानिवृत्त सैनिकांचा उपस्थित सर्वांनीच सत्कार करीत, कार्यक्रमाला उपस्थित सर्वच मान्यवरांचा सत्कार आयोजकांच्या वतीने करण्यात आला. प्रास्ताविक अतुल विंचूरकर यांनी केले तर नितिन माळी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पंचक्रोशीतील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत