राजुरा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस आघाडीवर
काँग्रेस-11, भाजप-8, गोंडवाना-4, शेतकरी संघटना-3, अपक्ष-3 तर शिवसेना-1
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,सुभाष अलगमकर, राजुरा : राजुरा तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत 30 ग्रामपंचायतीचा निकाल काल दि 17 जाहीर झाला असून, काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक 11 ग्रामपंचायत मध्ये, तर भाजप ने 8 ग्रामपंचायत मध्ये, गोंडवाना गणतंत्र पार्टी 4 ग्रामपंचायत, शेतकरी संघटना 3 ग्रामपंचायत, अपक्ष 3 ग्रामपंचायत तर शिवसेना 1 ग्रामपंचायत अश्याप्रकारे सरपंच बसविण्यात यश राजकीय पक्षांना आले. यावेळी प्रथमच सरपंच पद हे जनतेतून निवडून आल्याने गावाचा विकास अधिक झपाट्याने होईल अशी लोकांमध्ये समज निर्माण झाली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत