Breaking News

जुना पोडसा येथे वर्धा नदी पात्रात आढळला अज्ञात व्यक्तीचा कूजलेल्या अवस्थेत मृतदेह

 जुना पोडसा येथे वर्धा नदी पात्रात आढळला अज्ञात व्यक्तीचा कूजलेल्या अवस्थेत मृतदेह

महा घडामोडी न्युज शहर प्रतिनिधी, प्रविण चिडे, विरूर : लाठी पोलीस स्टेशन अंतर्गत जुना पोडसा गावाजवळ वर्धा नदी पात्रात पुलाचे खाली अनोळखी इसमाचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.सदर घटना शनिवारी दिनांक 24 सप्टेंबर सुमारास उघडकीस आल्याने या घटनेबाबत जुना पोडसा येथील सरपंच देविदास सातपुते यांनी लाठी पोलीस स्टेशनला फोन द्वारे माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, नदीपात्राच्या पुलाच्या खाली कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अंदाजे 30 ते 35 वर्ष वयाच्या एका पुरुषाचा पूर्णपणे कुजलेल्या स्थितीत मृतदेह पडून होता.

 त्या कुजलेल्या मृतदेहाचा पंचनामा केला असता, सडपातळ बांधा वय 30 ते 35 वर्ष उंची अंदाजे पाच फूट पोशाख कमरेला निळसर रंगाचा जीन्स फुल पॅन्ट ज्याला काळया रंगाचा चामडी बेल्ट घालून असलेला, मृतदेहाची ओळख अद्याप पर्यंत पटली नसून, सदर मृतदेह हा पाण्यात वाहून आल्याचा अंदाज आहे. अनोळखी इसमाचे प्रेत पूर्णपणे कुजलेल्या स्थितीत मिळून आल्याने, उप पोलीस स्टेशन लाठी येथे मर्ग क्र. ०६/२२ कलम १७४ जाफौ अन्वये नोंद करण्यात आले आहे. अनोळखी इसमाची ओळख पटविणे सुरू आहे. तरी पुढील तपास श्री मनोहर मोगरे ठाणेदार उप पोलीस स्टेशन लाठी व सुनील राऊत पोहवा यांच्याकडून करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत