कोरंभी देवी येथे गरबा कार्यक्रमाचे जनसेवक पवन मस्के यांच्या हस्ते उद्घाटन
कोरंभी देवी येथे गरबा कार्यक्रमाचे जनसेवक पवन मस्के यांच्या हस्ते उद्घाटन
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, नरेंद्र मेश्राम, भंडारा : ग्राम दैवत माता पिंगलेश्वरी देवस्थान कोरंबी (देवी) येथे जय बजरंग आखाडा कोरंभी देवी यांच्या माध्यमातून आज मोठ्या उत्साहाने गरबा ग्रुप गराडा बुज यांच्या गरबा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पवन भाऊ मस्के हे होते. यावेळी पवन मस्के यांनी युवक वर्गांना मार्गदर्शन केले. प्राचीन असे देवस्थान कोरंबीबद्दल अनेक असे महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या व कार्यक्रमांमध्ये एक नवा दिशा देत कार्यक्रमाची सांगता केली.
या कार्यक्रमांमध्ये आदर्श युवा मंच चे अध्यक्ष संजु मते, माजी सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे, मनसे जिल्हाध्यक्ष वानखेडेजी, जिल्हा सचिव शैलेशजी गजभिये, अजयजी लुटे, चेतनजी जोध आदी मान्यवर व असंख्य भावीक भक्त कार्यक्रमात उपस्थित होते. याच आखाड्यातर्फे अखेरच्या दिवशी रावण दहनाचा कार्यक्रम प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहाने संपन्न होतो. त्या कार्यक्रमात देखील प्रत्येक वर्षी पवन भाऊ हजेरी लावून कार्यक्रमाला युवकांचे मनोबल वाढवण्याचा मोठा स्तरावर कार्य करत असतात. याही वर्षी मोठ्या संख्येने नागरिकांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन पवन मस्के यांनी यावेळी केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत