Breaking News

भूमिअभिलेख अहवालानुसार सुमठाणा ते मांजरी रस्ता मोकळा करून देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ

 भूमिअभिलेख अहवालानुसार सुमठाणा ते मांजरी रस्ता मोकळा करून देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ

 अमरण उपोषणाचा इशारा

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,बालाजी सुवर्णकार, उदगीर : उदगीर तालुक्यातील सुमठाणा ते मांजरी मंजूर रस्ता आडवणूकीमूळे अपूर्ण आहे. गेल्या दीड वर्षापूर्वी रस्ता मोकळा करुन देण्यासाठी मा. तहसीलदार साहेब उदगीर. यांच्याकडे प्रस्ताव व अर्ज दाखल केला आहे. मा.तहसीलदार साहेब यांनी शेतकरी बांधवांमध्ये मध्यस्थी केली होती. संबंधित शेतकर्याकडून आमच्या गटात वाटच नाही अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. या घटनेनंतर पूर्वीपासून चालत आलेला वहिवाट रस्ता फक्त गट 11 ,12व13 चे शेतकरी, रस्ता आमच्या गटात नाही म्हणून वाट बंद केली,आडवली, वाटेने जाणाऱ्या शेतकऱ्यावर खोटी पोलीस केस करुन धमकी देऊ लागले.या बाबी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देताच.. परिस्थितीची गंभीर दखल घेऊन मा. तहसीलदार साहेब यांनी मोजणी अहवाल द्वारा रस्ता काढून देण्यासाठी वचनबद्धता दर्शवली. त्यांच्या सल्ल्यानुसार व नियमानुसार भूमिअभिलेखकडे फीस शेतकरी बांधवांनी रस्ता काढून घेण्यासाठी विनंती अर्ज केला. दि.२२/७/२०२१रोजी अति तातडीची मोजणी फी भरून सुद्धा, वारंवार कार्यालयाशी चकरा मारव्या लागल्या. दि.४/३/२०२२ तब्बल आठ महिन्यानंतर 

 भुमिअभिलेख चा अहवाल मिळाला. अर्ज व अहवाल कार्यालयात दाखल केला गेला. पुढील कार्यवाही तात्काळ व्हावी. ही विनंती वारंवार अनेक अर्जाद्वारे करून सुध्दा प्रशासनाकडून याकडे दूर्लक्ष व दिरंगाई करण्यात आली. दरम्यान शेतकऱ्यांच्या अनेक नुकसान झाले रस्त्या भावी पुरात जनावरे वाहून गेली शेतीकडे जाता आले नाही त्यामुळे तब्बल दोन-तीन हेक्टरी पडून आहे.वाटेविना शेतीकडे वाहन जात नसल्यामुळे शेतीकडे ये -जा करणे, मालाची वाहतूक करणे, गुरेढोरे घेऊन जाणे, रात्री-बेरात्री फिरणे आदी हैरानीबाबत त्रस्त झाले आहेत . प्रशासनांना वारंवार तोंडी व लेखी अर्ज देऊन सुद्धा.. प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईची संधी साधून, विरोध करणाऱ्या शेतकऱ्याकडून पर्यायी सुमठाणा ते नळगीर डांबरी रस्ता उपलब्ध आहे.असा खोटा अर्ज कोर्टात मनाई हुकुम मागण्यासाठी करण्यात आला. गेल्या महिन्याभरात वहिवाट रस्ता थांबवण्याबाबत त्यांना मनाई हुकुम मिळाला नाही.

हे ही मा.तहसीलदार साहेबांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. दि. 19/9/2022 आपणास विनंती केल्यानंतर मंडळ अधिकारी यांना समक्ष बोलावून पिक निघे पर्यंत बंधाऱ्यांच्या कडेने पर्यायी रस्ता दोन दिवसात काढून द्यावा.असे बजावण्यात आले. संबंधित अधिकारी आमच्या संपर्कात न येता अनेक कारणं सांगून टाळाटाळ करत आहेत. माननीय तहसीलदार साहेबांच्या आदेशाचे अवमान त्यांच्याकडून वारंवार करण्यात आले आहे. याचं गांभीर्य आपण जर वेळीच घेतलं असतं तर आज पर्यंत रस्ता केव्हांच मोकळा होऊन गेला असता. प्रशासनावर पूर्णता विश्वास टाकून शेतकऱ्यांचा विश्वासघात झाला. 

याकडे गांभीर्याने व जातीने लक्ष देऊन निर्णय घ्यावा अन्यत: दि 6/10/2022 पासून गुराढोरासहीत अमरण उपोषण करु.... हा शेतकरी व शेतकरी माता भगिनीचा निर्वानिचा इशारा देण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत