विरुर स्टेशन येथील काँग्रेसच शिष्टमंडळ (TMO) तालुका मेडिकल ऑफिसर राजुरा यांचा भेटीला
प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी. व गर्भवती स्त्रियांनी सर्व सोई सुविधा मिळण्यात याव्या करिता दिले निवेदन
महा घडामोडी न्युज शहर प्रतिनिधी, प्रविण चिडे, विरूर : विरुर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होऊन बरेच दिवस झाले. एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने रुग्णांना उपचार करण्याकरिता मोठी कसरत करावी लागत आहे. वैद्यकीय डॉक्टर एक रुग्ण 200 रुग्णांचा उपचार करणे, वैद्यकीय अधिकारी यांना सुध्दा अवघड होताना दिसून येत आहे, तरी पण वैद्यकीय अधिकारी रुग्णांना आपली सेवा देण्याकरिता तत्पर दिसून येतात.जर वैद्यकीय अधिकारी यांना आजार आला, किंवा त्यांना कुठे जायचे असल्यास त्या वेळेला संपूर्ण आरोग्य केंद्रच बंद असते,
त्या वेळेला रुग्णाची मात्र मोठी हेडसाड होताना दिसून येत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राला सहा उपकेंद्र जोडले आहे, विरूर हा मोठा गाव असून इथे मोठी बाजारपेठ आहे, व या संपूर्ण क्षेत्र आदिवासी बहुल असून इथली सहा उपकेंद्राचे लोकसंख्या 120000 अंदाजे इतकी असून, इथला कारभार फक्त एकाच वैद्यकीय अधिकारी यांच्यावर असल्याने काँग्रेसचे शिष्टमंडळ यांनी या सर्व बाबी TMO यांना निदर्शनास आणून दिले.तसेच तालुका मेडिकल ऑफिसर यांना आम्हाला एकाच डॉक्टरनी रुग्णांना उपचार करणे कठीण असून, आम्हाला लवकरात लवकर दुसरा डॉक्टर देण्यात यावा.
जसे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला दोन डॉक्टर असतात, त्याच प्रमाणे आम्हाला सुध्दा दोन डॉक्टर असायला पाहिजे, व गर्भवती महीलाची डिलिव्हरी इथेच व्हावी. प्रत्येक गर्भवती महिलांना आपना कडून राजुरा येथे रेफर केल्या जातात. पूर्वी उपकेंद्र असताना गर्भवती महिलांना ज्या सुविधा उपकेंद्रात दिल्या जात होत्या. त्या सुविधा आरोग्य केंद्र होऊन त्या सुविधा मिळत नसल्याने, काँग्रेसचे शिष्टमंडळ यांनी (TMO) तालुका मेडिकल ऑफिसर यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. व त्यांना निवेदन देण्यात आले, त्यावेळी विरूर स्टेशन येथील सरपंच भाग्यश्री आत्राम.रुपाली ताकसांडे. अजय रेड्डी.सुरेश पावडे. आक्केवार साहेब. राजू इग्रपवार. ज्ञानेश्वर तुरानकार.ज्ञानेश्वर मोरे.प्रविण चिडे इत्यादी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत