बोदवड शहरात अवैध 41 ओंडक्यांवर वन विभागाची जप्तीची कारवाई !
बोदवड शहरात अवैध 41 ओंडक्यांवर वन विभागाची जप्तीची कारवाई !
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, सतीश बावस्कर, जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातून अवैध वृक्षतोड करुन वाहतूक करणारे ट्रॅक्टर बोदवड शहरातील राज हाॅटेल च्या मागे लाकडी ओंडके फेकुन पसार झाले. याबाबत पाहणी केली असता याठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड करुन लाकडी ओडक्यांचे साठे साठविल्याबाबतचा प्रकार निदर्शनास आला. याबाबतची माहिती वन विभागाला देण्यात आल्यानंतर वनपाल उमाकांत कोळी यांनी तक्रारदार छावा संघटनेचे विधानसभा संपर्कप्रमुख अमोल व्यवहारे यांचे समक्ष रात्रीच्या सुमारास पाहणी केली. यानंतर दिनांक 04 रोजी 10:30 च्या सुमारास वनपाल उमाकांत कोळी व वनरक्षक दिपाली शिर्के यांनी पंचनामे केले. पंचनाम्यात एकुण 41 लाकडाचे ओले ओंडक्यांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. यांत निम 07 , वावळी 22 , पळस 1 , बाभूळ 11 असे ओंडक्यांवर कारवाई करण्यात आली.
बोदवड तालुक्यात साॅमिल चालक बेकायदेशीर वृक्षतोड करुन लाकडी ओंडक्यांचा अवैध साठा साॅमिल परिसरात साठवित असल्याबाबतच्या तक्रारी राष्ट्रीय छावा संघटनेचे संपर्कप्रमुख अमोल व्यवहारे यांनी वन विभागाकडे सातत्याने करत आहे. सहाय्यक वनसंरक्षक व वन परिक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे यांचेकडून याबाबत चौकशी करण्यात आली आहे. गत दोन महिन्यांत अवैध वृक्षतोड वाहतुकीवर 90 टक्के परिणाम झाला असून साॅ मिल चालकांचे धाबे दणाणले आहेत. शहराच्या बाहेर अज्ञात ठिकाणी अवैध लाकडी ओंडक्यांची साठेबाजी करण्यात येत आहे. वृक्ष लावणे जेवढे आवश्यक आहे त्यापेक्षाही आहे ती वृक्ष वाचविणे काळाची गरज झाली आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अवैध वृक्षतोड निदर्शनास आल्यावर संपर्क करण्याचे आवाहन अमोल व्यवहारे यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत