Breaking News

खिर्डी शिवारात चोरटे सक्रिय. हजारो रुपयांचा कापसाची चोरी

 खिर्डी शिवारात चोरटे सक्रिय. हजारो रुपयांचा कापसाची चोरी

महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, सतीश बावस्कर, जळगाव : रावेर तालुक्यातील खिर्डी शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातून चंद्र प्रकाशाचा फायदा घेत, अज्ञात चोरट्याने जवळपास चार ते पाच क्विंटल कापूस चोरी केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकिस आली. पूर्वीच अतिवृष्टीमुळे झालेला शेतकऱ्यांना पावसाची उघडी ती नंतर कापूस वेचणी करण्याची लगबग सुरू असताना, चंद्र प्रकाशाचा फायदा घेत, खिर्डी शिवारात अज्ञात चोरट्यांचे कापूस चोरी करणारी टोळी सक्रिय झाले आहे.

तसेच रब्बी पिक पेरणीचे काम सुरू असल्याने, कापूस योजनेसाठी मजूर मिळत नसल्याने, अनेक शेतकऱ्यांनी कापूस वेचणी थांबवावी लागली आहे. परंतु कापुस व्यसनी न झालेल्या शेतावर अज्ञात चोरटे पाळत ठेवून रात्रीच्या वेळेस शेतातून कापसाची सर्रासपणे चोरी करत आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे, तसेच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून शेतकरी हवालदिन झाले आहेत. कापूस चोऱ्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या असून रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पीक संस्था तसेच पोलिसासमोर मात्र अज्ञात चोरट्याने आव्हान उभे केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत