बिबट्याच्या हल्यात 52 वर्षीय शेतकऱ्यांचा मृत्यू
बिबट्याच्या हल्यात 52 वर्षीय शेतकऱ्यांचा मृत्यू
शेतपिकाची राखण करणे भोवले महागात
घटनास्थळी मृताच्या कुटुंबियांना 25 हजार रुपये रोख व एका मुलाला कंत्राटी कामगार म्हणून घेण्याचे आश्वासन
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,सुभाष अलगमकर, राजुरा : तालुक्यातील विरुर वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या चिंचोली बिट क्रमांक 141 लगत असलेल्या सुबई येथील थोमपूर शेत शिवारात भीमराव भद्रु घुंगलोत वय 55 वर्ष स्वतः च्या शेतात पिकाची राखण करण्याकरिता गेले असता आज दि 6 नोव्हेंबर रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास बिबट्याने त्यांचेवर हल्ला केला सदर इसम हा शेतात दहा फुटाच्या माऱ्यावर चढून पिकाची राखण करीत होता बिबट्याने माऱ्यावर चढून सदर इसमावर हल्ला करून त्याला घटना स्थळापासून दोनशे मीटर अंतरावर झुडुपात ओढत नेले ही घटना जागली गेलेल्या शेजारील शेतातील व्यक्तीकडून कळली, या घटनेबाबत वनविभाग व विरुर पोलीस स्टेशन यांना कळविण्यात आले त्यांचेकडून सदर घटनेचा पंचनामा करण्यात येऊन मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना घटनास्थळी रोख पंचवीस हजार रुपये दिले व कंत्राटी कामगार म्हणून सेवेत घेण्याबाबत वनविभागाकडून लेखी स्वरूपात आश्वासन देण्यात आले.
सदर व्यक्ती विरुर क्षेत्रातील सुबई थोमपूर येथील रहिवासी त्याच्या पश्चात पत्नी , दोन मुले व एक मुलगी असा आप्त परिवार आहे, घटनास्थळी वन परिक्षेत्र अधिकारी डी. एम. पवार, राठोड बिट वनपाल, मांदाडे परिक्षेत्र अधिकारी, गोविंदवार तसेच सर्व विरुर परिसरातील वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण, मेजर वागदरकर, हवालदार पवार, व इतर कर्मचारी पुढील तपास करत आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत