Breaking News

न.ह.रांका हायस्कूल व ज्यू कॉलेज च्या मनमानी व अनागोंदी कारभाराची चौकशीची मागणी

अनुसूचीत जातीच्या विद्यार्थ्यांकडून फी च्या नावाखाली वसूली

महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, सतीश बावस्कर, जळगाव : बोदवड तालुक्यातील नामांकित नथमल हजारीमल रांका (न,ह, रांका) हायस्कूल व ज्यू कॉलेज मध्ये राजाराम चंद्रभान शेजोळे, राहणार रेवती तालुका बोदवड यांचा मुलगा सुमेध राजाराम शेजोळे हा बोदवड येथील न ह रांका हायस्कूल व ज्यू कॉलेज मध्ये इयत्ता अकरावी कला या वर्गासाठी दिनांक २६/०७/२०२२ / रोजी प्रवेश घेण्यासाठी गेला असता,त्याच्याकडून ईमारत बांधकाम (रख रखाव निधी) म्हणून तीनशे रुपये,(३००रू) त्याच प्रमाणे वर्ग फी दोनशे पन्नास (२५०रू), सत्र व परीक्षा फी शंभर रुपये (१००रू), लायब्ररी फी शंभर रुपये (१०० रु),लॅब डिपॉजिट पन्नास रुपये, (५०रू ), संगणक डाटा पन्नास रुपये (५०रू) असे एकूण आठशेपन्नास रुपये (८५०रू) घेण्यात आले, 

परंतु शासनाच्या आदेश अन्वये कुठल्याही विध्यार्थ्याकडून फी वसुली करण्यात येऊ नये असा आदेश असताना देखील, सदर कॉलेजने शासनाच्या नियमाचे उल्लंघन केलेले आहे. सुमेध राजाराम शेजोळे हा अनुसूचित जाती चा विद्यार्थी असून सुध्दा फी वसूल करण्यात आली आहे,त्याचे नाव शाळेतून काढण्यात आले, मात्र भरलेली फी वापस देण्यात आलेली नाही, रख रखाव निधी म्हणून अनेक वर्षांपासून वसूल केला जात आहे, असे अनेक पालकांच्या चर्चेतून समजते,याबत गट शिक्षण अधिकारी बी एन लहासे यांना आमचें प्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष समोरा समोर विचारले असताा, असा नियम नाही ते नियमात बसत नाही,असे सांगितले,

अनु सूचीत जातीच्या अनुसूचित जमातीच्या,भटक्या विमुक्त जमातीच्या विद्यार्थ्याच्या शुल्काची (फी) प्रतिपूर्ती शासनाकडून विहित केलेल्या दराने विशेष समाज कल्याण अधिकारी कार्यालय कडून वितरित करण्यात येते. या बाबत राजाराम चंद्रभान शेजोळे यांनी शिक्षण अधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद जळगांव यांच्या कडे तक्रार अर्ज दिला आहे.आज पर्यंत कोणतीही कारवाई करण्यात केलेली नाही,या बाबत आमचे प्रतिनिधी जिल्हा परिषदचे माध्यमिक शिक्षण अधिकारी श्री बच्छाव यांच्या भ्रमण ध्वनी वर संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की जर शाळा अनुदानित आहे तर शुल्क घेण्याचा काही अधिकार नाही, 

सदर अर्जाची चौकशी गट शिक्षण अधिकारी यांना मी आदेशित करतो,असे सांगितले , तक्रार अर्ज देऊन दोन महिने झाले तरी अद्याप कोणतीही चौकशी झाली नाही, सदरच्या अर्जाची तात्काळ चौकशी करून शाळेने घेतलेली फी विद्यार्थ्याला परत करावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत