बोदवड येथील अमर डेअरी फॅक्टरी अनधिकृत असल्याचा नगररचना विभागाचा खुलासा
बोदवड येथील अमर डेअरी फॅक्टरी अनधिकृत असल्याचा नगररचना विभागाचा खुलासा
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर,जळगाव : बोदवड येथील नाडगाव रस्त्यावरील अमर डेअरी फॅक्टरी जिथे दुधापासून अनेक पदार्थ बनवले जातात त्या फॅक्टरीला नगररचना विभागाकडून परवानगी देण्यात आली आहे काय? याविषयी माहिती अधिकारात माहिती मागितली होती.परंतु नगर रचना व मूल्य निर्धारण विभाग जळगाव यांच्या माहितीनुसार अशी कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. अथवा अढळ होत नाही असे उत्तर आले आहे. त्यामुळे अमर डेअरी अनधिकृत असल्याचे वृत्त समोर आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की बोदवड येथील नाडगाव रस्त्याने असलेली अमर डेअरी फॅक्टरी ही अधिकृत आहे किंवा नाही याविषयी प्रांत अधिकारी भुसावळ यांच्याकडे अर्ज केला होता.परंतु त्यांनी स्पष्ट सांगितले की आमच्याकडून कोणत्याही प्रकारे अमर डेअरीला परवानगी दिलेली नाही.त्यामुळे जळगाव येथील नगररचना व मूल्यनिर्धारण विभाग यांच्याकडे माहिती अधिकारांमध्ये दिनांक ६/९/२०२२ रोजी माहिती विचारण्यात आली होती की, बोदवड येथील गट नंबर 231 मध्ये रहिवासी प्रयोजनार्थ प्लॉट पडलेले आहे.तिथे एमआयडीसी एरिया नसतांना अमर डेअरी फॅक्टरीला आपण कशी काय? परवानगी दिली,कोणत्या आधारावर परवानगी दिली याविषयी माहिती अधिकारात विचारणा केली गेलेली होती. परंतु तेथील सहाय्यक संचालक जन माहिती अधिकारी यांनी स्पष्ट खुलासा दिला आहे.
आमच्याकडून अथवा आमच्या कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारे अमर डेअरीला परवानगी देण्यात आली आल्याचे आढळून येत नाही. त्यामुळे अमर डेअरी ही अनधिकृत रित्या सुरू असल्याचे निष्पन्न होत आहे. एवढेच नव्हे तर बोदवड येथील नगरपरिषद यांच्याकडे माहिती अधिकारात विचारणा करण्यात आली होती की अमर डेअरीला बांधकाम परवानगी देण्यात आलेली आहे का?त्यांनी सुद्धा अमर डेअरीला कोणत्याही प्रकारे बांधकाम परवानगी देण्यात आलेली नाही. असे स्पष्ट उत्तर दिलेले आहे. जर प्रत्येक कार्यालयातकडून अमर डेअरी कारखान्याने कोणत्याही प्रकारे परवानगी घेतलेली नाही. तर हा प्रोजेक्ट रहिवासी एरियामध्ये सुरू कसा ? अमर डेअरीचे दूध पावडर पासून बनवलेले असल्याने त्यावर स्पष्ट लिहिलंय जाते टोन्ड दूध आणि ते शरीरासाठी हानिकारक असल्यामुळे त्यापासून जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण होतो मग असे दूध किंवा त्या दुधापासून बनवलेले पदार्थ मिश्रित असल्यामुळे निकृष्ट दर्जाचे तयार होते. त्यामुळे यापासून लोकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे, अमर डेअरी दूध पावडर पासून अनेक पदार्थ बनवतात व दुसऱ्या व्यापाऱ्याकडून दूध पावडर खरेदी करतात, असे त्यांनी मागे फिर्यादीमध्ये म्हटलेले होते.
पावणेतीन कोटी रुपयांची दूध पावडर संबंधित व्यापाऱ्याने त्यांना न पुरवल्यामुळे अमरलाल खत्री यांनी त्या व्यापारावर गुन्हा दाखल केलेला होता.याचा अर्थ पावणेतीन कोटी रुपयांची दूध पावडर जनतेच्या घशात घातली जाते.अशी बातमी सुद्धा मागच्या अंकात लावलेली होती.दूध पावडर पासून अनेक पदार्थ निकृष्ट दर्जाचे बनवल्या जाते त्यात कपडे धुण्याची पावडर मिश्रित केल्याचेही जनतेत बोलले जाते.परिणामी अशी डेअरी बंद का करण्यात येत नाही.यामागे कोणाचा हात आहे अशी ही चर्चा दबक्या आवाजात बोदवडच्या जनतेत केली जात आहे. बोदवड येथील मुख्य अधिकारी यांचे कर्तव्य आहे की बोदवड मध्ये होत असलेले अतिक्रमण किंवा ज्यांनी नगरपंचायत कडून बांधकाम परवानगी घेतलेली नाही किंवा अनधिकृत रित्या व्यवसाय सुरू आहे त्यांचे बांधकाम पाडणे किंवा फॅक्टरी बंद करणे हे अधिकार नगरपरिषद ला आहे परंतु ते पैशांमुळे किंवा लोभामुळे कोणतीही कार्यवाही करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे.
एवढेच नव्हेतर अमर खत्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज च्या पुतळ्याच्या जागेवर सुद्धा अनधिकृतरित्या अमर हॉटेल बांधलेली आहे.याविषयी समाजसेवक विनोद पाडर यांनी आवाज उचललेला आहे व नगरपरिषद ने सुद्धा ठराव घेऊन ते तोडण्यात यावे असे आश्वासन दिलेले आहे आत्मदहन करणारे विनोद पावडर यांना असे आश्वासन दिल्यामुळे त्यांनी आत्मदहनाला सध्या स्थगती दिलेली आहे.परंतु कर्तव्यदक्ष अधिकारी आकाश डोईफोडे साहेब याकडे कोणतेही लक्ष देत नाही. फक्त टाळाटाळ करण्याचा किंवा वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर देखील कार्यवाही व्हावी अशी मागणीही जनतेतून केली जात आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत