Breaking News

लंपीं आजारात मृत्यू मुखी पडलेल्या गाय बैल पशुधनाची भरपाई रक्कम NDRF दराने मिळावी

लंपीं आजारात मृत्यू मुखी पडलेल्या गाय बैल पशुधनाची भरपाई रक्कम NDRF दराने मिळावी           

बोदवड तालुका राष्ट्रवादीची मागणी 

महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, सतीश बावस्कर, जळगाव : बोदवड तहसीलदार तथा तालुक्याचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणून जबाबदारी असल्याने त्यांचे कडे सदर NDRF धर्तीवर 40 हजार रुपये किमती ने भरपाई रक्कम मिळावी म्हणून मागणी करण्यात आली.गेल्या चार महिन्ांपासून मोठ्या प्रमाणात बोदवड तालुक्यात लंपी आजाराने आज पर्यंत सुमारे 2200 जनावरांना बाधा झाली यात 204 जनावरे दगावली. प्रत्येक जनावर साधरण 40 ते 50 हजार रुपये किमतीचे असल्याने तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर,पशुपालक यांचे 80 लाख रुपये किंमतीची नुकसान झाले आहे. 

आबा पाटील,पुढे म्हणाले की,2200 जनावरे बाधित झाली यात जनावरे अशक्त झाल्याने या पुढे गाय प्रजनन किंवा दूध उत्पादन करू शकणार नाही अथवा बैल कुठल्याही कष्टाच्या कामासाठी उपयोगात येणार नाही.म्हणून या तालुक्याचे या आजारात कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. अजून ही धोका टळलेल्या नाही. शास्वत उपाय योजना न झाल्यास पशूधनाची हानी अटळ आहे.पुरेसे प्रमाणात पशू वैद्यक व आय औषधसाठा प्रत्यक्ष उपलब्ध करावा अशी मागणी शेतकरी बांधव करीत आहेत.

यावेळी तालुक्यातील पशू पालक व राष्ट्रवादीचे सन्माननीय पदाधिकारी डॉ.काजळे दादा,मधु आण्णा पाटील,रामराव पाटील, विजय चौधरी,प्रदीप बडगुजर,सतीश पाटील,समाधान पा.जगदीश कोळी,डॉ.सुर्यवंशी,यशवंत गोसावी,बहादुर सिंह पाटील, फिला राजपूत,विकास पाटील,गजानन सावरीपगार तुषार पाटील ई उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत