बोदवड तालुक्यातील ग्रामपंचायत कारभारात सरपंच सदस्य पतीराजांची लुडबुड : कठोर पाऊले उचलण्याची गरज
बोदवड तालुक्यातील ग्रामपंचायत कारभारात सरपंच सदस्य पतीराजांची लुडबुड : कठोर पाऊले उचलण्याची गरज
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, सतीश बावस्कर, जळगाव : बोदवड तालुक्यातील साधारण ३८ ग्रामपंचायती आहेत,या सर्वच ग्रामपंचायतींना गावाचा विकास करायची कास लागली आहे, सर्वच पदाधिकारी काहीतरी गावाला मिळवण्यासाठी धडपड करत असतात.असे असले तरी ६० ते ७० वर्षाचा काळ लोटला गेला तरी तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतीपैकी किती ग्रामपंचायती स्वयंभू होवून त्यांचा खर्या अर्थाने शाश्वत विकास झाला हा संशोधनाचाच विषय आहे.तालुक्यात २७ ग्रामसेवक पदाची जागा असतांना मात्र १८ ग्रामसेवकांच्या खांद्यावर अतिरिक्त बोजा आहे त्यामुळेही गावाच्या विकासाला खिळ बसत आहे.
-महिला पदाधिकारी फक्त नामधारी बोदवड तालुक्यातील ग्रामपंचायतीवर ७० टक्के च्यावर महिला आरंक्षित आहेत या महिला सरपंचाबरोबर उपसरपंच सदस्ययांचे पती किंवा नातेवाईक यांच्याकडुन महिला पदाधिकार्यांच्या कार्यात हस्तक्षेप केला जात असल्याचे तालुक्यात चित्र आहे स्थानिक राजकारणात महिला सक्रिय झाल्याचा आभास निर्माण केला जात आहे महिलांना राजकारणात ५० टक्के आरक्षण दिले असले तरी ग्रामपंचायत कारभारात त्यांचे पतीच व नातेवाईक लुडबुड करत असल्याचे चित्र आहे या महिला पतींना ग्रामसेवकासह अधिकारी वर्ग सहकार्य करित असतात त्यामुळे आरक्षणाचा हेतू सफल झाला नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे यामुळे ग्रामपंचायतीमध्ये महिला सक्षमीकरणाचा उददेशच फोल ठरल्याचे दिसुन येत आहे.
बोदवड तालुक्यातील अनेक गावांमध्ये ग््रामपंचायतीच्या मासिक बैठकिला सुध्दा महिला सदस्या उपस्तित राहत नाहित, त्यांच्या उपस्तितिच्या सह्या घेण्यासाठी प्रोसिडिंग बुकसुद्धा ग्रामपंचायत शिपायाला घरी घेऊन जावे लागते. सर्वप्रकारच्या निर्णय प्रक्रियेत महिला सदस्यांचेच पतीच आग्रस्थानी असल्याचे चित्र अनेक गावांमध्ये आहे. महिला सर्वच आघाड्यावर चमकदार कामगिरी करित आहेत अतिशय कुशलपणे प्रशासन हाताळण्यापासुन समाजकार्यात मोलाचे योगदान देतांना दिसत आहेत परंतू ग्रामिण पातळीवर याची अंमलबजावणी करित असतांना महिला पतिराजांचा हस्तक्षेप यामुळे गावविकासाला खिळ बसत असल्याचे चित्र बोदवड तालुक्यात आहे.
तसेच एखादा ग्रामसेवक यावर कठोर कार्यवाही करण्यासाठी धस्तावतो तरी महिला पतींकडुन अधिकार्याला धमकावले जात असल्याचे बोलले जात आहे. व त्या ग्रामपंचायतीला चालवणार्या जबाबदार व्यक्तींवरची ती जबाबदारी त्यांनी नेटकेपणाने पार पाडली नाही म्हणून सर्वसाधारणपणे दिले जाते व याच उत्तरला पं.समिती, जिल्हा परिषद , राज्यशासन तसेच केंद्रशासन देखील ग्राह्य धरते.

.jpeg)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत