Breaking News

बोदवड येथील जामठी रस्त्यावरील डंम्पिंगग्राऊंड हटवण्याची मागणी

 पेट घेतलेल्या धुरामुळे श्वसनाचा त्रास होण्याची शक्यता   

महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर, जळगाव : बोदवड येथील जामठी रस्त्यावर असलेले डंम्पिंग ग्राऊड हटविण्याची मगणी जामठी येथील नागरिकांन सह इतरत्र वाहनधारकांनकडून व येथुन प्रवास करणार्या प्रवाशांनकडून होत असुन हे डंम्पिंग ग्राऊंड त्वरीत हटवावे अशी मागणी करण्यात येत आहे.याबाबत अधिक माहिती अशी की बोदवड येथील नगरपंचायत विभागाच्यावतीने शहरातील कचरा व घाण  शहरातून संकलित करून गावाबाहेर टाकण्याचे काम नगरपंचायत स्थापनेपासून सुरू करण्यात आलेली आहे.

 तरी नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने जामठी रस्त्यावरील मोठ्या तलावामध्ये या डम्पिंग ग्राउंड ची निर्मिती करण्यात आलेली आहे तरी या डम्पिंग ग्राउंड मध्ये शहरातील संकलित केलेल्या कचरा हा येथे आणून टाकून पेटवण्यात येतो तरी या पेटवलेल्या कचऱ्याच्या धुरामुळे अनेक वेळा अनेक वाहनधारकांना समोरून येणाऱ्या वाहनांची दिशा कळत नसल्याने अनेकदा अपघात होतात तथा या डम्पिंग ग्राउंड मध्ये अनेक वेळा मेलेले कुत्रे व जनावरे ही पडलेले असल्याने मोठ्या प्रमाणावर दुर्गंधीचे वातावरण या रस्त्यावर होत असल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना व प्रवाशांचा जीव गुदमरत असल्याने नागरिकांच्या जीवनाशी खेळ सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान जवळच असलेल्या झोपडपट्टीतील नागरिकांनाही याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत असून येथील नागरिकांचे आरोग्यही  मोठ्या प्रमाणावर धोक्यात आले आहे तरी नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने या ठिकाणची डम्पिंग ग्राऊंड इतरत्र हलवावे व जामठी रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे आरोग्य सुरक्षित करावे ही मागणी येथील वाहनधारकांकडून व प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

फार पूर्वीपासून घनकचरा जाळूनच त्याची विल्हेवाट लावली जाते. परंतु त्यामुळे हवेचे प्रदूषण होते व पर्यावरणाचे आरोग्य धोक्यात येते. अर्थव्यवस्था सुधारते तसे कचरा जास्त निर्माण होतो. कच-याचे प्रकारही वाढत जातात. हा अनेक प्रकारचा कचरा वेगवेगळया समस्या निर्माण करतो. आजार, प्रदूषण, सौंदर्यहानी आणि पर्यावरणाचे नुकसान असे अनेक प्रश्न निर्माण होतात. म्हणूनच घनकचरा व्यवस्थापन करताना काही उद्दिष्टे बोदवड नगरपंचायतने लक्षात ठेवायला पाहिजेत.

आरोग्य-संरक्षण, जीवनाची गुणवत्ता सुधारणे. पर्यावरण प्रदूषण टाळणे, परिसर स्वच्छता. भंगार-कच-यावर पुनर्प्रक्रिया होण्यासाठी चालना देणे. जैविक-कच-यातून ऊर्जा निर्माण करून इंधन वाचवणे. या सगळयातून काही रोजगार निर्मिती करणे. संपूर्ण स्वच्छतेसाठी कचरा व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा घटक आहे. आपल्या केरकच-यात विविध पदार्थ असतात; त्यात वर्गवारी करावी लागते. वर्गवारी केल्याशिवाय घनकचरा व्यवस्थापन चांगल होऊ शकणार नाही दोन वर्षापुर्वी नगरपंचायत मार्फत घनकचरा व्यवस्थापनाचे प्रकल्प तयार करण्याचे शासनाचे उद्दीष्टे होते मात्र नगरपंचायतीची उदासिनता तसेच तत्कालीन नगरसेवक यांच्या अनास्थेमुळे प्रकल्पाचे काय झाले हि खबरच बोदवड करांना नाहिय तसेच बोदवश शहराचा विचार जर केला नगरपंचायत मार्फत घनकचर्याचे व्यवस्थापण जामठी रोडने केले जाते व त्याठिकाणी कचरा नष्ट करित असतांना मोठ्या प्रमाणावर २४ तास धुर निघत असतो त्यामुळे बोदवड वरुनजामठी किंवा मनुर येथे जाणार्या रस्त्याने धुळीचे तांडवदिसुनयेतात त्यामुळे वाहनधारकांना समोरचे वाहनदिसत नाही तसेच शेजारील झोपडपट्टित राहणार्या लोकांना याचा त्रास सहनकरावा लागतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत