मा.मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांची पुण्यतिथी अनोख्या पद्धतीने उत्साहात साजरी
मुक्ताईनगर येथे मा.मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांची पुण्यतिथी अनोख्या पद्धतीने उत्साहात साजरी
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, गजानन बावस्कर, बोदवड : दिनांक 24 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे द्वितीय मुख्यमंत्री बेलदार समाज भूषण दादासाहेब कन्नमवार यांची पुण्यतिथी आज अनोख्या पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली.दादासाहेब कन्नमवार यांच्या पुण्यभूमीत काम केलेले मुक्ताईनगरचे पोलीस इन्स्पेक्टर श्री विठ्ठल ससे साहेब यांना विशेष आमंत्रित करण्यात आले व त्यांच्या हस्ते त्याचप्रमाणे बेलदार समाजातील जेष्ठ कार्यकर्त्यांकडून प्रतिमा पूजन करण्यात आले यात बेलदार समाज महासंघटनेचे राज्य अध्यक्ष मा.जानकीरामजी पांडे यांचे वडील श्री देवचंदराव पांडे व सेवानिवृत्त वनपाल श्री तुकारामजी घाटे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्याची मुहूर्तमेढ करण्यात आली.
यावेळी जानकीरामजी पांडे यांनी दादासाहेब कन्नमवार यांचा राज्याच्या जडणघडणीत केलेल्या कार्याबद्दल समाज बांधवांना माहिती देताना सांगितले की साहेबांनी वर्धा सारख्या उभ्या करून देशाचे संरक्षण व्यवस्था मजबूत केली व त्यामुळे या पत्ती कारक परिस्थिती उद्भवल्यास उपाय म्हणून आशियातील सर्वात मोठे नागपूर मेडिकल कॉलेजची स्थापना केली त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आऊसाहेब जिजाऊ मासाहेब यांचा इतिहास दादासाहेब कन्नमवार यांनी लिहिला व जिजाऊ साहेबांच्या नावाने भारतातील पहिला साखर कारखाना बुलढाणा ते सिंदखेड राजा येथे दादासाहेब कन्नमवार यांनी काढला अशी दादांसाहेबांविषयीची माहिती सांगितली व पोलीस इन्स्पेक्टर विठ्ठलजी ससे साहेबांनी कन्नमवार साहेब यांच्याशी संबंधित वेगवेगळ्या संस्थांची,माहिती पुरवून कन्नमवार साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी बेलदार समाज महासंघटनेचे कार्यकर्ते जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष श्री .पंकजची घटे,ब्रिजलालजी पाखरे, समाधानजी पांडे, निलेशजी घटे गणेशजी घटे, शांतारामजी बेलदार,मुकेशजी घटे,राजेश जी पांडे, किशोर घटे,किशोरमुंडे आदी समाज बांधव उपस्थित राहून मोठ्या उत्साहात माजी मुख्यमंत्री उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांची पुण्यतिथी साजरी करून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे अभिवचन देण्यात आले .व याही पुढे युवकांच्या अशाच नवीन कल्पनांचा विचार करून नवनवीन उपक्रम देण्याचे जाहीर करण्यात आले. कारण समाजातील ज्येष्ठ बांधवांकडून प्रतिमा पूजन करून पुण्यतिथी साजरी करावी ही अभिनव कल्पना बेलदार समाज युवक महासंघटने कडून करण्यात आलेली होती आणि ती उत्तमरीत्या राबविण्यात आली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत