माणिकगड सिमेंट कंपनी अत्याचाराचा बळी भीमा मडावी यांची अखेर न्यायालयात धाव !
माणिकगड सिमेंट कंपनी अत्याचाराचा बळी भीमा मडावी यांची अखेर न्यायालयात धाव !
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, शेख हक्कानी, जिवती : माणिकगड सिमेंट कंपनीच्या कुसुंबी माईन्स येथे बाम्बेझरी शिवारातील भीमा मडावी यांचे सर्वे.नं.४७ व ४८ ची १ हे.४५ आर शेतजमीन उध्वस्त करून कंपनी व्यवस्थापनाने भूसंपादन भूपृष्ठ अधिकार नसताना कंपनीने मंजूर क्षेत्राबाहेर असलेल्या शेत जमिनीवर कब्जा करून चुनखडी उत्खनन केले. या बाबत अनेक तक्रारी महसूल व पोलीस प्रशासनाकडे करण्यात आले.मात्र न्यायाच्या प्रतीक्षेत कुटुंबाची भूक भागवण्यासाठी त्याने जंगल क्षेत्रात गांजा लागवड केली व पोलीस कार्यवाहीने त्याला आर्थिक अडचणीमुळे आठ महिने जेल ची हवा खावी लागली.
मात्र पोलीस प्रशासनाने कंपनी विरोधात साधी विचारपूस सुद्धा केली नसल्याने व बेघर झालेल्या आदिवासी कुटुंबावर अन्याय झाला असताना भीमा मडावी प्रशासनाकडे दाद मिळाली नसल्याने अखेर माणिकगड सिमेंट कंपनीच्या झालेल्या अन्याय विरोधात अनु.जमाती प्रतिबंध व जमीन हडप करून केलेल्या अन्याय विरोधात न्यायालयात प्रकरण दखन करून कारवाहीची मागणी केली असून न्यायालयाने सुनावणी घेऊन पक्षकाराची बाजू ऐकून घेतली.न्यालयाच्या आदेशाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत