Breaking News

पोरगी माती आणायला मैदानात गेली, नराधम लक्ष ठेऊन होता, त्याने बोरं देण्याचं आमिष दाखवलं अन्...

 पोरगी माती आणायला मैदानात गेली, नराधम लक्ष ठेऊन होता, त्याने बोरं देण्याचं आमिष दाखवलं अन्...

महा घडामोडी न्यूज नेटवर्क, नागपूर : बोर देण्याच्या बहाण्याने युवकाने सात वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार केला. ही खळबळजनक घटना कळमना पोलिस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आली. पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून युवकाला अटक केली. समीर बहार आलम सिद्दीकी (वय २०) असे अटकेतील युवकाचे नाव आहे. तो सेंट्रिंगचे काम करतो.

हेही वाचा :  पाणीपुरवठा योजनेच्या व्हाॅल्व्ह पळविणाऱ्या तीन चोरट्यांच्या सावली पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित सात वर्षीय मुलगी पहिल्या वर्गात शिकते. तिचे आई वडील खासगी काम करतात. मुलीला शिक्षकाने मातीचे फळ बनवायला सांगितले. शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ती बहिण व मैत्रिणीसह माती आणायला मैदानात गेली. यावेळी समीर तेथे आला. त्याने पीडित मुलीला बोर देण्याच्या बहाण्याने परिसरातीलच झोपडीत नेले. तिथे तिच्यावर बलात्कार केला.

हेही वाचा : उधारीच्या पैशांसाठी मध्यरात्री मित्रानेच केलं काडं, आधी खून केला अन् नंतर..

मुलीने आरडा-ओरड केली. तिची बहीण व मैत्रिण तेथे गेली. त्यांना बघताच समीर हा तेथून पसार झाला. पीडित मुलीला घेऊन तिची बहीण घरी आली. नातेवाइकांना घडलेला प्रकार सांगितला. एका नातेवाइकाने पोलिस नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली. नियंत्रण कक्षाने कळमना पोलिसांना कळविले. माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक संजय माने यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. घटनेची माहिती घेतली. शोध घेऊन पोलिसांनी समीरला अटक केली.

हेही वाचा :  पोलिसाचा गस्तीमुळे घर आगीतून बचावले 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत