लोकजीवन महाविद्यालय, बेला ची विज्ञान शाखा 100%
लोकजीवन महाविद्यालय, बेला ची विज्ञान शाखा 100%
![]() |
| प्रांजल मून व पायल नेवारे यांचा गौरव करताना प्राचार्य तिडके व इतर शिक्षक गण |
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, विनोद कुमार डांगरे, बेला : येथील लोकजीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावी विज्ञान शाखेचा निकाल यंदाही शंभर टक्के असा नेत्रदीपक लागला असून त्यातून मयुरी पांडुरंग अतकर (78.17) या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला. कला शाखेचा निकाल 87% लागला असून त्यामध्ये मीनाक्षी प्रमोद शेवाळे हि पहिल्या क्रमांकाची मानकरी ठरली. याशिवाय ,नीरज नारायण पिसे (72.67) याचा द्वितीय क्रमांक तर ज्ञानेश्वरी प्रदीप अर्धापुरकर (71.83) ही तृतीय आली आहे. कला शाखेतून मीनाक्षी रमेश चौधरी ,सुहानी प्रमोद चौधरी यांनी सुद्धा सुयश प्राप्त केले आहे. लोकजीवन शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष वर्षाताई बाभुळकर सचिव एड. सुबोध देशमुख व प्राचार्य सुनील मुलेवार यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या संस्थेचे सचिव सुबोध जी देशमुख सर व संस्थेचे अध्यक्ष वर्षाताई बाभूळकर मॅडम व प्राचार्य मुलेवार सर यांनी अभिनंदन केले
प्राचार्यांनी केला गुणवंतांचा सत्कार
बेला : विमलाबाई तिडके विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातून बारावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला प्रांजल गौतम मुन व व्दितीय आलेल्या पायल बाळकृष्ण नेवारे या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेचे प्राचार्य राजेंद्र तिडके यांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. शाळेत झालेल्या या सन्मान सोहळ्याला प्रा .रविदास उरकुडे , पुष्पा भोयर, सेवानिवृत्त शिक्षक रमेशराव भोयर, संदिप शहाणे, दिलीप ढबाले, संदिप लांबट प्रामुख्याने उपस्थित होते. 79.06 टक्के असा या शाळेचा निकाल लागला असून 47 पैकी 34 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. उज्वला वरखेडे ही तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत