ब्रम्हपुरी वनविभाग परिसरात सागवान व अन्य झाडांची तसेच वन्य प्राण्यांची तस्करी
आम आदमी पार्टी ब्रम्हपुरी यांची तक्रार
महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी, नावेद खान, चंद्रपूर : ब्रम्हपुरी वनविभाग अधिकारी व कर्मचारी यांच्या दुर्लक्षमुळे वनपरिक्षेत्र परिसरात होणाऱ्या सागवान व अन्य झाडांची तस्करी होत आहे. याचा जबाबदार कोण..?
यांचा मुख्य कारण असे की सदर वनपरिक्षेत्र परिसरातील आजूबाजूच्या गावात खुलेआम विना परवानगी सागवानचे पलंग सोफा बनवण्याचे गोरखधंदा सुरु आहे. आणि सागवान कटाई सॉ मिल मध्ये ब्रम्हपुरी व इतर ठिकाणी होत आहे. ब्रम्हपुरी वनपरीक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी बघ्यांची भूमिका घेत आहे का..? ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्र परिसरातील आजूबाजूच्या परिसरात मेंडकी, आक्सापूर, वांद्रा, एकारा, भूज, तोरगाव आदी गावातील वनपरिसरातील झाडांची व वन्य प्राण्यांची तस्करी होत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येत आहे.
याबाबत आम आदमी पार्टी जिल्हाउपाध्यक्ष श्री. नावेद खान यांनी स्वतः वनविभाग कार्यालय ब्रम्हपुरी येथे वनपरीक्षेत्र अधिकारी यांना माहिती दिली. परंतू अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. सामान्य नागरिकांना याबाबत असा प्रश्न पडला की, सागवान व अन्य झाडांची पलंग, आलमारी, सोफा विना टिपीने येत कसे आहेत..? अधिकारी वर्गाला विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तर दिले.
वनपरिक्षेत्र परिसरात कॅमेरे लावल्याने सुद्धा अशी चोरी होत असल्याने सुद्धा कारवाई करण्यात दिरंगाई होत आहे. याबाबत नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात असून आम आदमी पार्टी जिल्हाउपाध्यक्ष नावेद खान व कार्यकर्त्यांनी लेखी तक्रार देवून दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर सक्त कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे केली आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत