Breaking News

डिझेलचा अवैध साठा करणाऱ्यांवर कार्यवाही!

राजुरा पोलीसांनी केली धडक कारवाई, आरोपीला अटक.

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, बादल बेले, राजुरा : तालुक्यातील पवनी जिल्हा परिषद शाळा जवळील पडीत रूम मध्ये चार प्लास्टिक कॅनमध्ये डिझेलची साठवणूक करून असताना रेड केली असता कॅनमध्ये एकूण 120 लिटर डिझेल ज्वालाग्रही पदार्थ मिळून आला. या प्रकरणात आरोपी अमृतकुमार राजकुमार राजभर वय-28 वर्ष रा. पवनी याला अटक करून गुन्हा दाखल केला.

हेही वाचा : या मिळून चालवूया सायकल ! फिटनेस का डोज — आधा घंटा रोज !

राजुरा तालुक्यात पवनी भागामध्ये मोठ्या प्रमाणात कोळसाखानी सुरू असल्यामुळे वाहतूक दिवस-रात्र सुरू असते या परिसरामध्ये अवैध धंद्याना उधान आले आहे. जिल्हा परिषद शाळेच्या मागे एका पडीत घरामध्ये अवैद्यरित्या डिझेल विक्री होत असल्याबाबतची तक्रार पोलिसांना देण्यात आलेली होती, यावरून दिनांक 12 जुलै रोजी राजुरा पोलीसानी छापा मारला. यात रंगेहात 120 लिटर डिझेल अंदाजे दहा हजार आठशे रुपये किमतीचा साठा पोलिसांनी जप्त केला. 

हेही वाचा : गोवंश जनावरे तस्करीवर गडचांदूर पोलिसांची धडक कारवाई!

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक चंद्रपूर, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, मा. पोलीस निरीक्षक श्री सुमित परतेकी (म.पो.से.) यांचे नेतृत्वात सपोनी पवार, पाउपनि चाटे, काळे यांनी केली. आरोपी विरुद्ध अप. क्र.323/ 2025 बी.एन.एम. कलम 287 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत