Breaking News

राष्ट्रमाता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय देवाडा खुर्दच्या प्राचार्यपदी दिलीप मॅकलवार

दिलीप मॅकलवार यांना शुभेच्छा देतांना संस्थासचिव शंकरराव टिकले तथा सर्व कर्मचारी वृंद.

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर, पोंभुर्णा : राष्ट्रमाता ग्रामीण विकास शिक्षण प्रसारक मंडळ देवाडाखुर्द तर्फे संचालित राष्ट्रमाता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे जेष्ठ शिक्षक दिलीप मॅकलवार  यांची  व्यवस्थापन मंडळाने प्राचार्यपदी नुकतीच नियुक्ती केली असून त्यांनी आपला पदभार स्वीकारला आहे.

राष्ट्रमाता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य बंडु देऊरमल्ले हे नियत वयोमानानुसार दि.३० जुन रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी जेष्ठ शिक्षक दिलीप मॅकलवार यांना नियुक्त करण्यात आले. राष्ट्रमाता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे शनिवार दिनांक १२ जुलै ला एका छोटेखानी समारंभात मंडळाचे सचिव शंकरराव टिकले यांनी दिलीप मॅकलवार यांना प्राचार्यच्या खुर्ची वर स्थानापन्न केले, तसेच पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरवून अभिनंदन केले, त्यांना त्यांच्या भावी कारकिर्दीकरिता शुभेच्छा दिल्या.  यावेळी व्यवस्थापन मंडळाचे आभार मानत दिलीप मॅकलवार यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने संस्थेच्या प्रगतीसाठी  अथक परिश्रम करण्याची ग्वाही आपल्या मनोगतातून दिली. या छोटेखानी समारंभाला सर्व शिक्षक , प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार प्रदर्शन रविंद्र टिकले  यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत