अपघातग्रस्त कुटुंबांना दिलासा : आमदार देवराव भोंगळे यांच्या प्रयत्नांना यश
कापणगाव अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख रुपयांचे धनादेश वितरित
महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी, सुवर्णा बेले, राजुरा : कापणगाव गावाजवळ २८ ऑगस्ट रोजी झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला होता. ट्रक आणि ऑटोच्या भीषण धडकेत रवींद्र बोबडे, शंकर पिपरे, सौ. वर्षा मांदळे, तनु पिंपळकर, ताराबाई पपुलवार आणि ऑटो चालक प्रकाश मेश्राम यांचा करुण अंत झाला. या दुर्घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी मदत मिळेपर्यंत शवविच्छेदनाला नकार देत ठाम भूमिका घेतली होती.
या गंभीर परिस्थितीत आमदार देवराव भोंगळे यांनी पुढाकार घेऊन मृतांच्या कुटुंबियांना दिलासा मिळवून दिला. त्यांनी प्रशासकीय अधिकारी, मृतांचे नातेवाईक व ट्रक कंपनीचे प्रतिनिधी यांच्यात सर्वानुमते चर्चा घडवून आणत प्रत्येक मृताच्या कुटुंबाला ४ लाख रुपये मदतीचे आश्वासन मिळवले. त्यानंतर अंत्यसंस्कार पार पाडले गेले.
सोमवारी भाजपा जनसंपर्क कार्यालयात आमदार भोंगळे यांच्या हस्ते अपघातग्रस्तांच्या वारसांना ट्रक कंपनीतर्फे प्रत्येकी ४ लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले. या वेळी आशा मेश्राम, सुभाष पिंपळकर, कांताबाई पिपरे, बंडू मांदळे, मीना बोबडे, सुनीता बोबडे, राजेश पपुलवार, संजय पपुलवार, लक्ष्मी पुलगमवार यांच्यासह अपघातग्रस्त कुटुंबातील सदस्य धनादेश स्वीकारताना भावुक झाले.
या कार्यक्रमाला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनील उरकुडे, तालुकाध्यक्ष वामन तुराणकर, शहराध्यक्ष सुरेश रागीट, युवा मोर्चा अध्यक्ष प्रफुल घोटेकर, अजय राठोड, महामंत्री सचिन बल्की, बाबुराव मडावी, सुरेश धोटे, नितीन सिडाम, नितीन वासाडे, दिलीप गिरसावळे, हरिदास झाडे, सागर भटपल्लीवार, छबिलाल नाईक, प्रदीप मोरे, प्रफुल कावळे, वैभव पावडे, प्रदीप पाला यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
अपघातग्रस्त कुटुंबांना तातडीने मदत मिळवून देण्याचा भोंगळे यांचा ठाम व संवेदनशील प्रयत्न लोकांच्या मनाला भिडणारा ठरला आहे. राजुरातील जनतेने त्यांच्या या हस्तक्षेपाचे कौतुक केले असून, राजकीय पुढाऱ्याने दाखवायची जबाबदारी भोंगळे यांनी प्रभावीपणे पार पाडल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत