२१ वर्षांची प्रेरणादायी परंपरा! ‘विक्रमवीर’ आमदारांना अनोखं वाढदिवसाचं गिफ्ट
कोरपना तालुक्यात एकाच दिवशी तब्बल १३९४ नागरिकांकडून विक्रमी रक्तदान
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : राजुरा विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या मनात कामामुळे वेगळं स्थान निर्माण केलेल्या आमदार देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान महाशिबिराने कोरपना तालुक्यात इतिहास रचला आहे. ‘देवरावदादा मित्रपरिवार’ यांच्या पुढाकारातून आयोजित या महाशिबिरात कोरपना तालुक्यातील १३९४ रक्तदात्यांनी एकाच दिवशी रक्तदान करून अभूतपूर्व विक्रम नोंदवला.
२१ वर्षांची रक्तदान परंपरा — सेवाभावाची अखंड शपथ
दिवसेंदिवस वाढणाऱ्या सामाजिक गरजांमध्ये रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत आमदार भोंगळे यांनी गेली २१ वर्षे वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन सुरू ठेवले आहे. राजकीय आढ्यताखोर कार्यक्रमांऐवजी ‘जीवनदान’ देणाऱ्या उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्याची त्यांची परंपरा यावर्षी आणखी भव्य ठरली.
तालुक्यातील ८ केंद्रांवर उत्साही गर्दी — विक्रमाची नोंद
कोरपना तालुक्यातील ८ ठिकाणी रक्तदान केंद्रे उभारण्यात आली होती. प्रत्येक ठिकाणी तरुणाईसह सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत या उपक्रमाला यशस्वी केले.
✔ पारडी – १०१
✔ कोरपना – २५८
✔ वनसडी – १०७
✔ नारंडा – १७५
✔ बिबी – १५३
✔ नांदा फाटा – २२५
✔ कवठाळा – २६२
✔ गडचांदूर – ११३
एकूण १३९४ युनिट रक्त संकलन होताच तालुक्याने इतिहासात नोंद घेण्याजोगी झेप घेतली. या रक्तसंकलनामुळे आरोग्य सुविधांना मोठा दिलासा मिळणार असून रुग्णालयातील रक्तसाठा अधिक स्थिर होणार आहे. चंद्रपूर–यवतमाळ जिल्ह्यांतील २६ ठिकाणच्या एकत्रित शिबिरात ५३०२ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला — समाजिक ऐक्याचे अनोखे दर्शन!
“तुमच्या प्रेमाची उतराई होणे अशक्य!” — आमदार देवराव भोंगळे
रक्तदान शिबिरातील उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आमदार भोंगळे म्हणाले :
“आज मी वाढदिवस साजरा करत नाही; लोकांच्या प्राणरक्षणासाठी केलेले रक्तदान हा माझ्यासाठीच खरा उत्सव आहे. मागील २१ वर्षांपासून हा उपक्रम तुमच्या प्रेमामुळे यशस्वी होत आहे. रक्तदानासारखे पुण्यकर्म करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यामुळे समाजसेवेची मशाल तेजाने पेटलेली आहे.”
“रक्त कोणत्याही फॅक्टरीत तयार होत नाही; ते विकतही मिळत नाही. तुमच्या एका बाटली रक्ताने एखाद्या अपघातग्रस्ताचा, एका बालकाचा, प्रसूतीपश्चात संघर्ष करणाऱ्या आईचा जीव वाचतो. हे समाधान शब्दात मावणारे नाही.” आमदारांनी या महाशिबिरासाठी मेहनत घेणाऱ्या मित्रपरिवार, स्वयंसेवक आणि नागरिकांचे विशेष आभार मानले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत