गोंडगोवारी समाजाच्या उद्धारासाठी बौद्ध समाज धावणार...!
गोंडगोवारी समाजाच्या उद्धारासाठी बौद्ध समाज धावणार...!
दिलवर रामटेके यांचे प्रतिपादन : शहीद गोवारी स्मारकाचे उद्घाटन
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनीधी, संतोष रोकडे,गोंदीया : मागासवर्गीय समाजाचा विकासासाठी अनेक पायपीट करावी लागते, तरीही लढुन मागून आपला हक्क व अधीकार मिळत नाही. कारण पंधरा टक्केवाले लोकांच्या हातात सत्ता आहे. सत्तेच्या कामासाठी मागासवर्गीय जनता झिजते, पण लाभ किडीचा नाही. गोंडगोवारी समाजाने आपली बाजू भक्कम करुन लढावे. त्यांच्या पाठीशी बौद्ध समाज राहील, उद्धारासाठी केव्हाही धावणार असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते दिलवर रामटेके यांनी केले. ते कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
यावेळी मंचावर गोवारी समाजाचे मिशन जिल्हाध्यक्ष हेमराज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटक झेड आर दुधकूवर यांच्या हस्ते करण्यात आले. जि प सदस्य कविता कापगते, नामदेव ठाकरे, रुपेश चामलाटे, पंचायत समिती सदस्य सविता कोडापे, पंचायत समिती सदस्य होमराज कापगते, मानकर, शालिनी डोंगरवार, प्रमिला राऊत, अनिल दहिवले बालक बोरकर लैलेश शिवणकर रेखा व्यकंट खोब्रागडे, मंगला नैताम टिकाराम नेवारे आदी मंचावर उपस्थित होते.
सदर कार्यक्रम येरंडी टोली येथे दुपारी ०१.०० वाजता पार पडला. या स्मारकास टिकाराम श्रावण नेवारे यांनी मालकीची जागा आदिवासी गोंडगोवारी स्मारक समिती येरंडी यांना दान दिली. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी ११४ शहीद गोवारी स्मारकाचे विधीवत पुजन करुन मानवंदना दिली. शिवाजी महाराज, बिरसा मुंडा व डॉ आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. स्वागत गीताने कार्यक्रम सुरू झाले, महिलांचे सत्कारही करण्यात आले. मुले व मुलींचे नृत्यही सादर करण्यात आले. अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
स्मारकाचा उद्घाटन सोहळा हा थाटात संपन्न झाला, पूढे रामटेके म्हणाले खचून न जाता, हिमतीने एक होऊन राजकारणातही आपली जागा निर्माण करावी. तरच आपला गड राखता येईल.
प्रस्ताविक लंकेश राऊत यांनी मांडले, संचालन व आभार राजकुमार वाघाडे यांनी केले. तर यशस्वीतेसाठी भूपेंद्र राऊत, गुलाब वाघाडे, सम्राट नेवारे पितांबर वाघाडे, सेवक नेवारे, जीवन राऊत, तेजराम राऊत, शामराव सोनवणे यांनी परिश्रम घेतले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत