ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे येरंडीचे बाराही महीणे पाण्याविना हाल
ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे येरंडीचे बाराही महीणे पाण्याविना हाल
बाराही महीणे येरंडीत पुरेसा पाणी मिळत नाही.
ग्रामपंचायत नळांचा प्रकार : अधिकारी व पदाधिका-यांचे सर्रास दुर्लक्ष
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनीधी संतोष रोकडे,गोंदीया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी/देव या गावात अनेक वर्षापासून ग्रामपंचायतची नळ योजना सुरू आहे. पण या योजनेच्या नळांना विविध बहाणे सांगत व मनमर्जी कारभार करत पाणी सोडणे हे नियमाने व दररोज पुरेसा सुरळीत पाणी सोडत नसल्याने सामान्य नळधारकांना पाणी मिळत नसल्याचे नळधारक सांगतात. याप्रकाराची ग्रामपंचायचे अधिकारी व पदाधिकारी कधीच लक्ष घालत नाही. बाराही महीणे येरंडीत पुरेसा पाणी नाही.. पण का...?
सदर गावात या योजनेच्या नळांना पाणी पुरवठा व्हावा म्हणून एक वर्षापूर्वी रिडींग मीटर लावण्यात आले पण याचाही काहीच फायदा होत नाही. हे मीटर शोभेचे वस्तू ठरले आहे. पाणी सुरळीत होत नसल्याची तक्रार अनेकदा करण्यात येते पण स्थानिक शासन निद्रावस्थेत असते. पाणी सोडण्याची जबाबदारी पार पाडत नसेल कामावरून कमी करून त्याऐवजी दुसऱ्याची निवड करावी असे ही नागरिकांनी सांगितले याकडे ग्रामपंचायत कानाडोळा करत आहे. पाणी सोडणारा नळ सुरू करुन जलकुंभाजवळ राहत नसल्याचे अनेकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे हा प्रकार होत आहे.
गावातील पाणी गावक-यांनाच मनमर्जी प्रकाराने पुरेशा स्वरुपात मिळत नाही. तसेच सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या गावात टिल्लू पंपावाले यांचा चांगलाच धुमाकूळ सुरू आहे. पण ग्रामपंचायत काहीच करत नाही तर उलट टिल्लू पंपंवाल्यांनाच आशीर्वाद देतात. हा धुमाकूळ वार्ड क्रमांक तीनमध्ये खुलेआम चालतो.
अनेक सार्वजनिक नळ बंद...
यापूर्वीच्या कारकिर्दीत असलेल्या पदाधिका-यांनी मताचा राजकारण करण्यासाठी आपली सत्ता स्थापनेसाठी जलकुंभाची क्षमता न पाहता कुणालाही नळ दिले, त्यामुळे ही पाणी पुरवठा बरोबर होत नाही आणि अनेक सार्वजनिक नळ बंद पाडून ठेवले आहे.
टिल्लू पंपवाल्यांवर कारवाई नाही तर मूभा
रस्त्यावरून दिसत असले आणि खुलेआम टिल्लूपंप लावल्या जातात, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांना दिसल्यावर ही बोलत नाही. तर कारवाई कसे करतील असा प्रश्न नागरिक विचारतात. तरी कारवाई ऐवजी मूभा दिल्याचे समजते.
मीटर ठरले पांढरे हत्ती..
या गावातले नळांना लावलेले मीटर हे पांढरे हत्ती ठरले आहे. या मीटर प्रमाणे पाणी व बिलही येत नाही. यामुळेच टिल्लूपंपधारक चांगला फायदा घेत आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत