Breaking News

मोहाडी येथे महिला संम्मेलन सत्कार समारंभ

मोहाडी येथे महिला संम्मेलन सत्कार समारंभ



महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी,नरेंद्र मेश्राम,जिल्हा : दिनांक २७.३.२०२२ला परमात्मा एक भवन आंधळगाव रोड मोहाडी येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला संम्मेलन, सत्कार समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम व विविध खेळांची स्पर्धा,  एकल  नृत्य स्पर्धा, समुह नृत्य स्पर्धा, इनडोअर स्पर्धा, कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आले होते,  रंजीता राजू कारेमोरे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले, त्यावेळी कोविंड वारियर,  आशा वर्कर,  अंगणवाडी सेविका, महिला पोलीस,  महिला होमगार्ड,  महिला डॉक्टर नर्स, महिला जिल्हा परिषद सदस्य,  पंचायत समिती सदस्य, नगर पंचायत सदस्य, मोहाडी तालुक्यातील वर्ग १० व १२ मधून प्रथम, द्वितीय, तृतीय, क्रमांकाने उत्तीर्ण  झालेल्या विद्यार्थिनीना , रंजीता राजू कारेमोरे यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ, , ट्रॉफी, व आर्कषक बक्षीस देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले, त्याप्रसंगी प्रमुख महिला पदाधिकारी, समाजसेविका, ग्रामवासी,  जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, नगरपंचायत सदस्य, आशा सेविका, अंगणवाडी सेविका,  महिला भगिनीमोठ्या संख्येत उपस्थित होते. संयोजिका रंजीता राजू कारेमोरे महिला भगिनी व सखी मंडळ मोहाडी यांच्यावतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत