प्रहार अपंग क्रांती शाखेचा उद्घाटन सोहळा
प्रहार अपंग क्रांती शाखेचा उद्घाटन सोहळा
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, नरेंद्र मेश्राम,भंडारा : प्रहार अपंग क्रांती आंदोलन भंडारा जिल्ह्याच्या वतीने मौजा दिघोरी मोठी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्त प्रहार अपंग क्रांती आंदोलन शाखेचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष रवि मने उद्घाटक म्हणून तर प्रहार अपंग क्रांती जिल्हा सचिव योगेश्वर घाटबांधे कार्यक्रम अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तसेच सुनील कहालकर तालुका अध्यक्ष रामटेके अर्जुनी तालुका अध्यक्ष, वर्षाताई करंजेकर आयसीआरपी दिघोरी मोठी, योगेश फुलबांधे प्रहार शाखा अध्यक्ष, सुभाष बोरकर उपाध्यक्ष, बबन फुलबांधे, रेखाताई जांभुळकर महिला शाखा अध्यक्ष तसेच धमगाये सर ग्रामविस्तार अधिकारी आणि मेश्राम साहेब तलाठी कार्यक्रमाला उपस्थित होते.
या कार्यक्रम प्रसंगी माननीय नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या मातोश्री इंदिराबाई बाबाराव कडू यांचे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत