रॉयल्टीविना खासगी जागेतील गौण खनिज उत्खनन सुरू
रॉयल्टीविना खासगी जागेतील गौण खनिज उत्खनन सुरू
मुरमाडी/तूप व कन्हाळगाव येथील प्रकार
कालवा बांधकाम कंपनीचे अभियंता व महसूल कर्मचाऱ्यांचे अर्थपूर्ण संबंध
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी,नरेंद्र मेश्राम,भंडारा : अवैध गौण खनिज(माती) उत्खणानावर प्रतिबंध लावण्यास शासन प्रयत्नशील असून रॉयल्टी ची किंमत आणि ४ पट दंडाच्या रकमेची कायद्यात तरतूद करण्यात आली असली तरी महसूल विभागातील स्वार्थी अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे शासनाची उद्देशपूर्ती होत नाही. याचा प्रत्यय मुरमाडी/तूप व कन्हाळगाव येथे आला. कालवा बांधकाम कंपनीचे अभियंता प्रसाद यांच्याशी अर्थकारण करून विना परवानगीने खासगी जागेतील अवैध गौण खनिज उत्खनन सुरू असल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडण्याचे मार्गावर आहे.
मुरमाडी/तूप परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी. तथा जीवनमान उंचवावे. याकरिता इंदिरा सागर(गोसेखुर्द) प्रकल्पाअंतर्गत नेराला उपसा सिंचन योजनेमार्फत कालवे तयार करण्याचे काम सुरू आहे. याकरिता लागणारे साहित्य माती , मुरूम महसूल विभागाची परवानगी घेऊनच उत्खनन करावे असा नियम असला तरी कंत्राटदार आणि महसूल अधिकाऱ्याचे अर्थपूर्ण संबंधामुळे नियमाची पायमल्ली होत आहे.
मुरमाडी/तूप , घोडेझरी व्हाया निमगाव ह्या ४ ते ५ किमी कालवा बांधकामाचे ई-निविदा पद्धतीने कंत्राट विरोधी पक्षाच्या एका आमदाराच्या नातेवाईकाचे कंपनीस देण्यात आले असले तरी टक्केवारी हे सब कालवा बांधकाम व्यंकट राव ह्या कंत्राटदारास देण्यात आले आहे. कंत्राटदाराचे अभियंता प्रसाद यांचेमार्फत हे कालवा बांधकाम करण्यात येत असून यावर तांत्रिक मार्गदर्शन देखरेख व सनियंत्रणाचे काम गोसेखुर्द उपविभागीय जल संधारण अधिकारी आंबडी(भंडारा) येथील शाखा अभियंता पाटील यांचेकडे सोपविण्यात आले आहे.
कालवा बांधकामास जमीन समतोल करण्यासाठी लक्षावधी ब्रास मातीची आवश्यकता आहे. याकरिता महसूल विभागाची रीतसर परवानगी घेऊन(रॉयल्टी काढून) माती उत्खनन करणे आवश्यक होते. पण कंत्राटदाराने तसे न करता स्थानिक महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांशी संधान साधून खासगी जागेतील माती उत्खनन सुरू केले. नियमाप्रमाणे खासगी जागेतील मातीचे २ फुटांपेक्षा खोल उत्खनन करता येत नसले तरी कन्हाळगाव येथील एका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकाऱ्याची तसेच इतर एका व्यक्तीची १० ते १२ फूट खोल माती उत्खनन करण्यात आली.
तसेच मुरमाडी/तूप येथील एका शेतकऱ्याचे खासगी जागेतही असाच प्रकार करण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. या नियमबाह्य प्रकाराची वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी चौकशी करून नियमबाह्य माती उत्खनन केलेल्या जागेचे मोजमाप करून नियमानुसार दंडासह रॉयल्टीची रक्कम वसूल करणे गरजेचे झाले आहे.
नहर बांधकाम कंपनीकडून नहराच्या प्रस्तावित जागा समतल करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी अवैध माती उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळताच मौका चौकशी करून प्रतिवेदण वरिष्ठ कार्यालयास पाठविले आहे.मोरेश्वर मरस्कोल्हे तलाठी मुरमाडी/तूप.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत