Breaking News

जिवनशैलीत होणारे बदल हेच आजाराचे मूळ कारण- डॉ.मंगेश गुलवाडे

जिवनशैलीत होणारे बदल हेच आजाराचे मूळ कारण- डॉ.मंगेश गुलवाडे


भारतीय जनता पार्टी वैदकिय आघाडी व रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने निःशुल्क रोगनिदान शिबिर संपन्न



महा घडामोडी न्यूज नेटवर्क,चंद्रपूर : 3 मे जागतिक अस्थमा दिनाचे औचित्य साधुन महाराष्ट्र विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टी वैदकिय आघाडी महानगर चंद्रपूर तथा रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी तर्फे निःशुल्क आरोग्य रोगनिदान शिबिराचे आयोजन चंद्रपूर शहरातील आझाद गार्डन येथे करण्यात आले होते 


त्यावेळी भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी यावेळी सांगितले की मनुष्याच्या दैनंदिन जिवनशैली मध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे तो बदल आहारा  माध्यमातून मोठ्या प्रमाणात झालेला आहे जसे आधी आपल्या आहारात हिरव्या फळे भाज्यांचा समावेश असायचा तो आता हळू हळू कमी होत चालला आहे.


त्यामुळे जिवनशैली वर त्याचा विपरीत परीणाम होत असून हेच आजाराचे मूळ कारण असून त्यावर नियंत्रण मिळविणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले सदर निःशुल्क आरोग्य रोगनिदान शिबिर मध्ये 90 नागरिकांनी लाभ घेतला.


 यावेळी भारतीय जनता पार्टी वैदकीय आघाडी महानगर अध्यक्ष डॉ.किरण देशपांडे,रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी चंद्रपूर चे सचिव अमोल पोटुडे,भाजपा महानगर कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासनगोट्टूवार,मंडळ अध्यक्ष रवी लोणकर,आत्मनिर्भर भारत च्या जिल्हाध्यक्षा किरण बुटले,अनु.जमाती मोर्चा अध्यक्ष धनराज कोवे,महानगर सचिव राकेश बोमनवार, रामकुमार आक्केपल्लीवार, भारतीय जनता युवा मोर्चा महानगर उपाध्यक्ष यश बांगडे,सचिव प्रवीण उरकुडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती तसेच आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या चमू मध्ये डॉ अरुण कुलकर्णी, डॉ अमित देवइकर,डॉ.अशोक वासलवार,डॉ.आनंद बेंदले,डॉ.भुपेश भलमे यांचा समावेश होता तर आरोग्य कर्मचारी म्हणून आशा गेडाम,पूनम तांमगाडगे यांनी कार्य केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत