Breaking News

शेतशिवारातून चार लाखाच्या पाईप व्हालची चोरी

शेतशिवारातून चार लाखाच्या पाईप व्हालची चोरी 


अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल 



महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी,नरेंद्र मेश्राम,भंडारा ;
लाखनी तालुक्यात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशातच तालुक्यातील पालांदूर परिसरातील फार्महाऊसमध्ये ठेवलेले चार लाख रुपये किंमतीचे पाईप व्हॉल्व चोरीला जाण्याची घटना तालुक्यातील गुरढा शिवारात उघडकीस आली असून याप्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध पालांदूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पुणे येथील टी.ई.जंजिरे कन्स्ट्रक्शन कंपनीने विनायक बुरडे यांचे गुरढा येथील फार्महाऊस भाड्याने घेतले. त्यात केसरीवाल कंपनीचे विविध आकाराचे व्हॉल्व खुल्या पटांगणात व इमारतीच्या स्लॅबवर ठेवले होते. हे व्हॉल्व चोरी झाल्याचा अंदाज असून याप्रकरणी रुपेश यशवंत निमजे (रा.अड्याळ) यांनी पालांदूर ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध अप क्र.६१/२०२२ कलम भादंविनुसार गुन्ह्यांची नोंद केली आहे. अधिक तपास वीरसेन चहांदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या चोरीने आता पालांदूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत