Breaking News

नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांचा सत्कार

 नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांचा सत्कार

महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी संतोष रोकडे, गोंदिया अर्जुनी मोरगाव :- गोंदिया जिल्ह्यातील नुकत्याच पार पडलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव जिल्हा परिषद गण क्षेत्रातील नवनिर्वाचित निवडून आलेले उमेदवार जयश्री अनिल जी देशमुख जिल्हा परिषद सदस्य तसेच अर्जुनी मोरगाव पंचायत समिती क्षेत्राचे महागाव गणाचे उमेदवार श्री. प्रमोदकुमार लहानु लांडगे यांचा ग्रामपंचायत महागावच्या वतीने सरपंच श्री प्रभाकर अंतारामजी कोवे यांच्या हस्ते  शाल श्रीफळ पुष्पगुच्छ  देऊन सत्कार करण्यात आला.

 या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित उपसरपंच चंद्रभान वासुदेवजी पुस्तोडे,ग्रामपंचायत सदस्य छगन साखरे,ग्रामपंचायत सदस्य मंदाताई पात्रीकर, ग्रामपंचायत सदस्य निर्मला नाकाडे, ग्रामपंचायत  सदस्य सुंदरा कोल्हाटकर,ग्रामपंचायत सदस्य गायत्री उईके,

 ग्रामपंचायत सदस्य रसिका रामटेके तसेच ग्रामपंचायत महागावचे ग्राम विकास अधिकारी तसेच ग्रामपंचायत सर्व कर्मचारी  यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित  जिल्हा परिषद पंचायत समिती   सदस्यांचा  शाल श्रीफळ पुष्पगुच्छ  देऊन सत्कार करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत