Breaking News

तहसील कार्यालयातील जप्त वाहन रात्री सोडून देण्याचा मंडळ अधिकाऱ्याचा प्रयत्न अयशस्वी

 तहसील कार्यालयातील जप्त वाहन रात्री सोडून देण्याचा मंडळ अधिकाऱ्याचा प्रयत्न अयशस्वी

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,अश्र्वाजित हुमणे, ब्रम्हपुरी : तहसील कार्यालय ब्रह्मपुरी मध्ये वाळू तस्करी मधील अनेक वाहने जप्त केलेली आहेत. त्यामध्ये ट्रॅक्टर आणि टिप्पर ट्रक यांचा समावेश आहे.ब्रह्मपुरी तालुका हा रेती करिता जेवढा प्रसिद्ध आहे तेवढाच अवैध रेती तस्करी करिता सुद्धा प्रसिद्ध आहे. तालुक्यामध्ये अभय वाळू तस्करीबाबत वृत्तपत्रांमध्ये बातम्या वारंवार प्रसारित होत असतात, मात्र या अवैध वाळू तस्करी मध्ये लिफ्ट अधिकारी व कर्मचारी यांच्या आशीर्वादाने तालुक्यातील अवैध वाळू तस्करी बंद होण्याचा मार्ग सापडत नाही, मात्र बोटावर मोजण्या इतपत वाहने कोटा रेट म्हणून जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये ट्रक टिप्पर व ट्रॅक्टर यांचा समावेश आहे.

या वाहनातील काही वाहन आर्थिक हिताने सोडून देण्याचा प्रयत्न तालुक्यातील एका मंडळ अधिकाऱ्याने 30 सप्टेंबर च्या रात्री करण्याचा प्रयत्न केला. सदर बाब काही लोकांच्या नजरेत आल्याने त्यांनी काही पत्रकारांना याबाबत माहिती दिली, त्यामुळे पत्रकारांनी या ठिकाणी बरेच वाहन मालकांना सूचना दिली असता, वाहन मालक तहसील कार्यालय गाठल्याने या मंडळ अधिकाऱ्याचा आर्थिक हितातून वाहन सोडण्याचा करीत असलेला प्रयत्न पूर्णपणे अययशस्वी झाला.

 महसूल कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रातून राजरोसपणे वाळू तस्करी होत असल्याचे दिसून, सुद्धा या वाळू तस्करीवर कधीही अंकुश लावण्याचा प्रयत्न केलेला नाही. यांना शासनाकडून पगार मिळतो हे पगारी नोकर असताना शासनाने त्यांना दिलेले अधिकार अधिकारातील त्यांचे कर्तव्य विसरून आर्थिक हितामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुंतले असल्याची चर्चाही तालुक्यामध्ये जोरदार सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत