४ - ५ कोटीच्या आत असलेल्या १८ गाड्यांची किंमत ५४ कोटी झाली कशी ?
विजय वडेट्टीवार तुम्हीच सांगा जनतेला ४ - ५ कोटीच्या आत असलेल्या १८ गाड्यांची किंमत ५४ कोटी झाली कशी ?
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, नावेद खान,चंद्रपूर : कोविड काळात राज्यातील जनतेला मृत्यूच्या खाईत लोटून, जनतेला वाचवण्याच्या नावाखाली मृत देहाच्या टाळूवरचे लोणी खाण्यात महाविकास आघाडी सरकार मधील मदत - पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आघाडीवर होते. राज्यातील जनता रुग्ण वाहिकेसाठी रस्त्यावर तडफडत होती. काहीं रस्त्यावरच गतप्राण झाले. पण, त्याना रुग्ण वाहिका काही मिळाली नाही. महामारीचा काळात शत्रूला देखील माणुसकी दाखवतो पण, महाविकास आघाडी सरकार मधील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माणुसकीलाच काळिमा फासली.
कोरोना काळात जनतेच्या मदतीचा नावाखाली १८ देवदूत 'रॅपिड रेस्पॉन्स व्हेईकल्स' (RRVs) खरेदी करण्याचा निर्णय विजय वडेट्टीवार यांनी घेतला. आजच्या बाजार भावानुसार एका RRV गाडीची किंमत २५ लाख रुपये एवढी आहे. कदाचित ज्यावेळी खरेदी करण्यात आल्या त्यावेळी या पेक्षा कमीही असू शकते.आजच्या बाजार भावानुसार या सर्व १८ 'रॅपिड रेस्पॉन्स व्हेईकल्स' ची किंमत साडे ४ ते साडे ४ कोटी एवढी आहे. यात त्या सर्व वाहनांचा देखभालीचा खर्च जरी गृहीत धरला तर ५ कोटी पर्यंत जाणार नाही. पण, विजय वडेट्टीवार यांनी या सर्व गाड्या बाजार भावाच्या १० पट जास्त किंमतीने वाढवून घेतल्या. एका RRVs गाडीची किंमत २५ लाखावरून थेट २.५ कोटी पर्यंत गेली.
ठाकरे सरकारचे मंत्री विजय वडेट्टीवार यांना ते १८ RRVs खरेदीचं करायचेच होते. या हेतूने ४ जुलै २०२० रोजी पत्र काढून १६ महानगरपालिकांना आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाला RRVs प्रदान करणे आवश्यक असल्याचे म्हटले होते. एकीकडे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याकडे पैसे नाहीत असा टाहो फोडत असायचे त्यांच्याच नाकाखाली त्यांचे मंत्री ५ कोटींच्या आत असलेली वाहन खरेदी खर्च ५४ कोटीची भासवून राज्याच्या तिजोरीवर दरोडा घालण्याचा काम केलं. राज्यातील जनता कोविडने रस्त्यावर गतप्राण होताना, मंत्री वडेट्टीवार मदतीच्या नावाखाली मृतदेहांच्या टाळूवरचे लोणी खात होते.
५ कोटींच्या आत मध्ये असलेली वाहन खरेदी वडेट्टीवार यांनी ५४ कोटी कशी काय झाली? हे आता चौकशीत समोर येईलच. पण, विजय वडेट्टीवार यांनी चोर ते चोर वरून शिरजोर होण्याचा प्रयत्न करत असताना नवीन शोध लावला की, गाड्यांची किंमत GST मुळे वाढली.पण, यातून त्यांनी महत्वाची कबुली दिली की, बाजार भावाच्या १० पट जास्त किंमतीने वाहन खरेदी केलेल्या आहेत. GST चा दर जरी लागला; तर त्या वस्तूच्या मूळ किंमती पेक्षा १० पट नसतो, हे काही जनतेला सांगण्याची गरज नाही. त्यामुळे स्वतःला वाचवण्याच्या नादात विजय वडेट्टीवार यांनी त्यांनी केलेली चोरी कबूल केली.
राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी चौकशी करण्याचे आदेश दिलेच आहेत. लवकरच विजय वडेट्टीवार यांच्यावर कायदेशीर कारवाई होईलच. पण, कोविड काळात राज्यातील जनतेने माणुसकीचे दर्शन घडवत स्वतःच्या वाहनांना रुग्णाच्या सेवेसाठी मोफत दिलेले होते. पण, वडेट्टीवार सारख्या मंत्र्यांनी माणुसकीला काळिमा फासण्याचं काम केला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत