Breaking News

भास्करभाऊ तूपट यांचा वाढदवसानिमित्त रुग्णालयात फळ वाटप

भास्करभाऊ तूपट यांचा वाढदवसानिमित्त रुग्णालयात फळ वाटप

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, अश्वजीत हुमने,ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी तालुक्यातील उदापूर या गावात साधारण कुटुंबात जन्माला आलेला आणि संत महात्म्याच्या विचार धारेने प्रेरित होऊन गोर गरिबांच्या सेवेमध्ये समाजकार्यात स्वतःला वाहून घेणारा व्यक्ती भास्करभाऊ तूपट. गरजूंना मदत करणे, रुग्णांना आर्थिक मदत, साधारण नागरिकांना शासकीय कार्यालयात जाऊन त्यांची कामे करून देणे अशा सर्व प्रकारे गरजूंना मदत करणारे व्यक्तिमत्त्व भास्करभाऊ तूपट यांचा  दिनांक 30 सप्टेंबर रोजी ला वाढदिवस रुग्णांना फळ वाटप करून साजरा करण्यात आला.

 ब्रम्हपुरी ग्रामीण रुग्णलयामध्ये जाऊन भाऊच्या निमित्त फळ वाटप करून आणि रुग्णसेवा करणे यासाठी आपण नेहमी कार्यरत राहू असे मत त्यांनी व्यक्त केले.या वेळी आम आदमी पक्षाचे विधानसभा प्रमुख नावेद भाई तालुका अध्यक्ष दिलीप प्रधान, तालुका उपाध्यक्ष राहुल सोनटक्के, तालुका कोषाध्यक्ष आशूभाऊ,तालुका युवाध्यक्ष तहा पठाण,महिला आघाडी तालुका अध्यक्षा वैशाली नरेंद्रवार, उपाध्यक्षा भाविका बनकर आणि कार्यकर्ते तथा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, तसेच इतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत