Breaking News

हॅप्पी माईंड फाऊंडेशन मुक्ताईनगर, तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 हॅप्पी माईंड फाऊंडेशन मुक्ताईनगर, तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, सतीश बावस्कर, जळगाव : मुक्ताईनगर येथील हॅप्पी माईंड फाउंडेशन तर्फे नीट परीक्षेत उत्तीर्ण झालेले व वैद्यकीय क्षेत्रात प्रवेशित असलेले (M.B.B.S.) कु. साक्षी अतुल खर्चे 570 गुण असून, व चि.नरेश जोशी यास 565 गुण मिळालेले गुणवंत विद्यार्थ्यांचे हॅपी माईंड फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. तेजांशु सरोदे ,सचिव डॉ. प्रणिता सरोदे , उपाध्यक्ष प्रा.छाया खर्चे , डॉ. शुभम खर्चे, डॉ. मयुरी खर्चे ,व अनीश सरोदे यांनी या विद्यार्थ्यांचा सत्कार व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी डॉ.सरोदे यांनी विद्यार्थ्यांना जीवनात मार्गक्रमण करत असताना आपले ध्येय हे आकाशात भरारी घेणाऱ्या गरुडाप्रमाणे असावे वाट नसेल तर स्वतः वाट निर्माण करणे व मागीलांना त्या पाऊल खुणा सोडणे असे जीवनाचे मौलिक तत्व सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत