Breaking News

पोलिसाचा गस्तीमुळे घर आगीतून बचावले

 पोलिसाचा गस्तीमुळे घर आगीतून बचावले 

महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी, वरोरा : पोलिस स्टेशन वरोराचे पोलिस कर्मचारी वरोरा शहरात शुक्रवारी रात्री गस्त घालत होते. एका घरातून मोठ्या प्रमाणात धूर निघताना दिसला त्यांनी त्या घराकडे धाव घेतली घरातील कुटुंब झोपून होते त्यांना उठविले तर घरात आग लागली होती पोलिस कर्मचारी व कुठिंबियानी आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे एक मोठी दुर्घटना ठरल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा :  पाणीपुरवठा योजनेच्या व्हाॅल्व्ह पळविणाऱ्या तीन चोरट्यांच्या सावली पोलिसांनी आवळल्या मुसक्या

शुक्रवारी मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास या घरातून धूर निघत असल्याचे गस्तीवर असलेले पोलिस कर्मचारी कपिल भांडारवार मोहन निषाद. रंगराव पाटील यांना दिसले त्यांनी घराकडे धाव घेतली घरातील सदस्यांना उठविले आणि घरात आग लागल्याचे सांगितले.

हेही वाचा :  नगर परिषद ब्रम्हपुरी द्वारा शासकीय निधीचा दुरउपयोग होत आहे का ?

लगेच कुटुंबीयांनी व पोलिस कर्मचाऱ्यांनी तात्काळ. आगीवर नियत्रंण मिळविले . म्हणून पुढील अनर्थ टळल. विशेष म्हणजे या परिसरात दाट लोकवस्ती आहे..



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत